Share

MPSC : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा उमेदवारांसाठी आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय

Published On: 

मुंबई : कोरोना काळात एमपीएससी परीक्षांचे आयोजन रखडले होते. ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा तसेच दुय्यम सेवा अराजपत्रित पूर्व परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संक्रमणाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे या राज्य सेवा पूर्व परीक्षा व सर्व प्रकारच्या भरती परीक्षा या पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी मराठा समाज देखील आक्रमक झाला होता. आता या स्पर्धा परीक्षांच्या निश्चित तारखा देखील आयोगाने जाहीर केल्या आहेत. तर, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांसाठी आर्थिक दुर्बल मागासवर्गाच्या आरक्षणाचा मार्ग खुला केला आहे. राज्य सेवा आयोगाने देखील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातुन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी खुला गट व आर्थिक दुर्बल घटक (EWS) असा ऐच्छिक पर्याय निवडण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत १५ जानेवारी रोजी ११.५९ वाजता संपणार होती.

अनेक उमेदवारांनी अद्यापही खुला गट वा EWS यापैकी पर्याय काही कारणास्तव निवडलेला नाही. आता, राज्य सेवा आयोगाने या विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ केली आहे. २२ जानेवारी २०२१ रात्री ११.५९ वाजेपर्यंत उमेदवारांना विकल्प निवडण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रोफाइलमध्ये लॉगीन करून हा विकल्प निवडता येणार आहे.

कोणकोणत्या स्पर्धा परीक्षेसाठी हा विकल्प ?

  1. राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२०
  2. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२०
  3. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२०
  4. सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा-२०२०

परीक्षांच्या तारखा –

राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० आता रविवार, १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही शनिवार, २७ मार्च २०२१ रोजी घेण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० ही रविवार ११ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येईल असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!