कोल्हापूर : कोरोना नंतर महागाई आणि उत्पन्न यांचा ताळमेळ घालताना सामान्यांना कसरत करावी लागत असताना इंधनांची दरवाढ देखील लागोपाठ सुरूच आहे आज पुन्हा इंधनांच्या किंमतीत वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने ही वाढ झाल्याच सांगितलं जात आहे.
राज्यात गेले अनेक दिवस पेट्रोल हे नव्वदीपारचं आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर आर्थिक बोजा वाढत आहे. जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी ओळख असणाऱ्या या शहरात राज्यातील सर्वात उच्चांकी दराने पेट्रोल विकलं जात आहे. परभणीत सद्या ९३.६५ रुपये प्रतिलिटर असा पेट्रोलचा भाव आहे. तर राजधानी मुंबईत ९१.३२ रुपये प्रतिलिटर इतका भाव आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त एका नेत्याने अनोखी शक्कल लावून जनतेला रिटर्न गिफ्ट दिलं आहे. याची चर्चा सद्या चांगलीच रंगत आहे. कोल्हापुरातील भाजपचे नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांचा आज (१५ जानेवारी) रोजी वाढदिवस असतो. कोल्हापुरातील कावळा नाका परिसरातील महाडिक पेट्रोल पंपावर २ रुपये स्वस्ताने पेट्रोल विक्री करण्यात येत आहे. कोल्हापुरातील आजचा पेट्रोलचा दर हा ९१.६३ रुपये प्रतिलिटर असा आहे.
धनंजय महाडिक यांच्या जन्मदिनानिमित्त प्रत्येक वर्षी कोल्हापुरातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. कृषी प्रदर्शन, भिमा फेस्टिव्हल असे कार्यक्रम घेतले जातात. परंतु यंदा कोरोनाच्या धोक्यामुळे हे कार्यक्रम शक्य नसल्याने नागरिकांना आज २ रुपये स्वस्त भावाने पेट्रोल मिळणार आहे. त्यांचे पुत्र व आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेसर कृष्णराज महाडिक यांनी या उपक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजप आ. अभिमन्यू पवार यांना हायकोर्टाची नोटीस
- MPSC : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा उमेदवारांसाठी आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय
- मोठी बातमी : टीम इंडियाचा ‘हा’ गोलंदाज हॉस्पिटलमध्ये
- औरंगाबादेत पहिल्या दिवशी तेराशे कोरोना योद्ध्यांना लस
- पंकजा मुंडेकडून धनजंय महाडिकांचा ‘खासदार’ म्हणून उल्लेख


