सांगली : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.
या प्रकरणात अधिक गुंता वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात, ‘प्रत्येक महापुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही’ असं ते म्हणाले आहेत. यानंतर, उपस्थितांमध्ये हशा पिकला. अर्थात त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नसलं तरी चालू प्रकरणावरून त्यांचा रोख हा मुंडेंकडेच अडल्याच्या चर्चा यावेळी रंगल्या होत्या.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी आज (15 जानेवारी) राष्ट्रवादीने मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- विषय पंपावर : भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त चक्क पेट्रोल २ रुपये स्वस्त !
- MPSC : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा उमेदवारांसाठी आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय
- मोठी बातमी : टीम इंडियाचा ‘हा’ गोलंदाज हॉस्पिटलमध्ये
- औरंगाबादेत पहिल्या दिवशी तेराशे कोरोना योद्ध्यांना लस
- पंकजा मुंडेकडून धनजंय महाडिकांचा ‘खासदार’ म्हणून उल्लेख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

