Share

सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; शरद पवारांची ठाम भूमिका

Published On: 

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.

‘धनंजय मुंडे यांनी मला भेटून या प्रकरणातील त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी आरोपांची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्यावरील आरोपांचं स्वरूप हे गंभीर आहे. यावर आम्हाला पक्ष म्हणून निर्णय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन याविषयी निर्णय केला जाईल. मुंडेंनी मला सखोल माहिती दिली असून इतर सहकाऱ्यांना ती सांगून त्यांचे मत घेणं हे माझं कर्तव्य आहे.’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली होती.

आज त्यांनी या प्रकरणात पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. ‘महिलेने तक्रार केल्यानंतर मीडियातून आणखी नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रकरणावर पोलीस विभाग चौकशी करत आहेत. या बाबतीत आम्ही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी असं मला वाटतं. या महिलेने मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी आणि हे याबाबतीत सत्य समोर आणावं. महिलेच्या बाबतीत भाजपच्या एका नेत्याने स्टेटमेंट दिलं आहे. यामध्ये काळजीपूर्वक चौकशी करावी’, असं त्यांनी सांगितलं.

‘मुंडे यांचा राजीनामाचा घ्यावा किंवा नाही. यावर मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्या महिलेच्या बाबतीत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाही तर कुणावरही आरोप करायचे आणि त्या व्यक्तीला सत्तेपासून दूर करायचं अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे या घटनेतील सत्य समोर यायला व्हावं’ असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!