अमरावती : शहरातील समता कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून तब्बल ११९ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दिली. ही चोरी विस वर्षीय मुलीने तीच्या मित्राच्या मदतीने केली असल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या मुलीसह तीच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, समता कॉलनीत राहणाऱ्या या महिलेल्या घरातून डिसेंबर ते एप्रिल या पाच महिन्याच्या कालावधीत सोन्याच्या दोन पाटल्या, १८ ग्रॅमची सोनसाखळी, ५० ग्रॅमच्या दोन बांगड्या असा एकूण ११९ ग्रॅम वजनाच्या सोन्याची चोरी केली आहे. ही बाब आठ ते दहा दिवसांपुर्वी तक्रारदार महिलेच्या लक्षात आली. या प्रकरणात महिलेने गाडगेनगर पोलिसात तक्रार दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी गुन्ह दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतलेय. दरम्यान या प्रकरणाची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे. प्रेमप्रकरणातून मुलीने हे कृत्य केले की त्या मित्राने आमिष दाखवून चोरी करण्यास भाग पाडले या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ऑक्सिजनबाबत बुलडाणा प्रशासन गाफिल, आ.श्वेता महालेंची तक्रार
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- ‘शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करा’, शिक्षणमंत्री गायकवाड यांना निवेदन
- मोदी, ममतांच्या जाहीर सभा महागात, बंगालमध्ये रुग्ण पाच पट वाढले
- ‘राज्यातील जनतेपेक्षा ममतांना त्यांचा अहंकार महत्त्वाचा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
