Share

गृहमंत्री अमित शहांना भाजप खासदाराचा घरचा आहेर

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींसमोर यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप, तृणमूल आणि काँग्रेस-डावे अशी तिहेरी लढत होत आहे.

यावेळी भाजपने पश्चिम बंगालमध्ये सर्वप्रथमच एवढे लक्ष घातले असून, बंगालमधील प्रचार मोहिमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारीक नजर ठेवून आहेत. भाजपने बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे.

दरम्यान, या जाहिरनाम्यावरून भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या जाहीरनाम्यावरून अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांना भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी घरचा आहेर मिळला आहे.

भाजपने बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. अमित शहा यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केल्याने स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचा बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रसिद्ध केला, हे आश्चर्यच आहे. यातून चुकीचा संदेश जाणार असून, यातून भाजपच्या निवडणूक मोहिमेला धक्का बसेल. पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्षांच्या हस्तेच जाहीरनामा प्रसिद्ध करायला हवा होता, असे स्वामी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!