🕒 1 min read
नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. आसामच्या आगामी विधानसभा निवडणुका होत असल्याने देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीनिमित्ताने राहुल गांधी आसाम मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी एका प्रचारसभेत केंद्र सरकार तसेच आरएसएसवर सडकून टीका केली आहे. ‘नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आरएसएसला टोला लगावला आहे.
राहुल गांधी ‘देशात लोकशाहीचे पतन होत आहे. तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत. सीएए सुद्धा आहे. आसामची जनता दिल्लीत आल्यानंतर त्यांनी त्यांची संस्कृती, भाषा बदलावी, अशी आपण अपेक्षा ठेऊ शकत नाही. नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे’ असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी राहुल गांधी यांनी आसामच्या जनतेला पाच आश्वासने दिली आहेत.
आसामच्या निवडनुकीचे तीन टप्प्यात मतदान होणार असून २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी १ एप्रिल आणि तिसऱ्या टप्प्यासाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांचा निकाल २ मे रोजी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- रितेश आणि प्रीती झिंटाला एकत्र पाहून जेनेलिया संतापली…
- रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी करणाऱ्या चार रिक्षाचालकाविरूध्द गुन्हा दाखल
- व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक अचानक झाले डाऊन
- पुणे पोलिसांचं आता सायकल पेट्रोलिंग…
- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी अजितदादा-जयंत पाटील पंढरपुरात जाणार


