🕒 1 min read
पुणे: भाजपच्या माजी आमदार आणि नेत्या मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गंभीर आरोप करत तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरुड भागातील रामबाग कॉलनीत असलेल्या अनधिकृत जागेत ऊसाचे गुऱ्हाळ सुरु आहे. त्यामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याचा दावा गणेश कुंज सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र आता कुलकर्णींवरच मारहाणीचा आरोप झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यात कोथरुड परिसरातील सहजानंद सोसायटीजवळ दारु पिण्यास बसलेल्या युवकांनी मेधा कुलकर्णींसह तिघांना मारहाण केल्याची घटना जून २०२० मध्ये समोर आली होती. सहजानंद सोसायटीतील रहिवासी विलास कोल्हे कुत्र्याला घेऊन बाहेर गेले होते. त्यावेळी दारुड्यांनी आमच्यावर कुत्रा का सोडता, असं विचारत मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार मेधा कुलकर्णी घटनास्थळी पोहचल्या, त्या वेळी आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केला होता. या हल्ल्यात मेधा कुलकर्णी यांच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली होती. मात्र आता कुलकर्णींवरच मारहाणीचा आरोप झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- भेट न झाल्याने दिव्यांग युवकाने चक्क झोपून आमदार संजय राठोड यांची गाडी अडवली
- रितेश आणि प्रीती झिंटाला एकत्र पाहून जेनेलिया संतापली…
- व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक अचानक झाले डाऊन
- पुणे पोलिसांचं आता सायकल पेट्रोलिंग…
- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी अजितदादा-जयंत पाटील पंढरपुरात जाणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

