🕒 1 min read
मुंबई- मुंबईतील हाय प्रोफाइल परिसरात स्फोटकांसह आढळलेली गाडी आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे एपीआय सचिन वाझे यांना अटक झाली.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीत आढळलेल्या स्फोटक प्रकरणात तपास करत असलेल्या एनआयएच्या टीम ने घटनास्थळी रिक्रिएशन केलं आहे. शुक्रवारी (१९ मार्च २०२१) रात्री अकराच्या सुमारास एनआयएची टीम सचिन वाझे यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाली आणि रिक्रिएशन करण्यात आलं.
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला स्कॉर्पिओ गाडी बेवारस अवस्थेत आढळली. पुढे त्यात अडीच किलो जिलेटीन आणि अंबानी कुटुंबाला धमकावणारी चिठ्ठी आढळली. या परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाचे विश्लेषण केले असता ही स्कॉर्पिओ वाझे यांनी चालवत आणली आणि अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमायकल रोडवर उभी केली, असा संशय ‘एनआयए’ला आहे.
आधी सचिन वाझेंना शर्ट आणि पँटमध्ये चालायला सांगण्यात आल्यानंतर त्यांना कुर्ता आणि डोक्याला रुमाल बांधून चालायला लावण्यात आले. सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आणि सचिन वाझे यांच्यातील साधर्म्या तपासण्याचा प्रयत्न एनआयकडून करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mumbai: NIA takes suspended police officer Sachin Waze (person donning oversized kurta in pic 2) to the place near businessman Mukesh Ambani's residence where explosives were recovered from a car last month; the agency recreates the crime scene as part of ongoing investigation. pic.twitter.com/DnLrSZJB9K
— ANI (@ANI) March 19, 2021
पुण्यातून आलेल्या फॉरेन्सिक टीमने संपूर्ण रिक्रिएशन केले आहे. या रिक्रियेशनच्यावेळी एनएआयचे वरीष्ठ अधिकारी हजर होते. या नाट्यरूपांतराचे चित्रीकरण पुरावा म्हणून न्यायालयात सादर केला जाऊ शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.
दरम्यान,एनआयएने वाझे यांना अटक करुन या प्रकरणी अधिकाधिक भक्कम पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या गुन्ह्यात वापरलेल्या स्कॉर्पिओ आणि मुंबई पोलिसांच्या इनोव्हा कार पाठोपाठ एनआयएने आणखी तीन महागड्या गाड्या जप्त करुन पुढील तपास सुरू केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारनं कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावला’
- ‘व्यवहार माझे, जबाबदार वाझे!’ अमृता फडणवीस यांची बोचरी टीका
- ‘मला शिवसेना कळली, त्यामुळे खैरेंची गरज नाही, अंबादास दानवेंचा पलटवार
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- चाहत्यांना आश्चर्याचा धक्का रश्मिका चालावतीय शेतात नांगर पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

