Share

‘महाराष्ट्रात निवडणुका नाहीत, म्हणून केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. ‘महाराष्ट्रात निवडणुका नाहीत, म्हणून केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नाही’ असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

‘महाराष्ट्राला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय म्हणून बोंब मारायची आई दुसर्या बाजूला केंद्र सरकारने याबाबत कोणताही सहकार्य करायचं नाही. कारण, महाराष्ट्रात निवडणुका नाहीत. आणि निवडणुका झाल्या तरी भारतीय जनता पक्षाला यश मिळणार नाही. त्याच्यामुळे कोविडच्या लसीचा पुरवठा किंवा अन्य काही मदत करण्या संदर्भात असेल महाराष्ट्रावरती अन्याय होतो आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, हे मी एकटा बोलत नाही तर आरोग्यमंत्री सुद्धा हेच सांगत आहेत. अस देखील राऊत म्हणाले आहेत. या संदर्भातील महाराष्ट्र टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर सशांक जोशी यांनी सुद्धा स्टेटमेंट मध्ये अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने आपल्यावरील अन्यायाचा आवाज हा उठवत राहिला पाहिजे.’ असे ताशेरे राऊत यांनी केंद्र सरकारवर ओढले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!