Share

भेट न झाल्याने दिव्यांग युवकाने चक्क झोपून आमदार संजय राठोड यांची गाडी अडवली

Published On: 

🕒 1 min read

यवतमाळ : दिग्रस मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या वाहनासमोर एक दिव्यांग युवक झोपून अचानक आडवा झाल्याने एकच खळबळ उडाली. आपल्या भागातील रस्त्याचे प्रलंबित कामासाठी त्याने हे पाऊल उचलले आणि लागलीच संजय राठोड यांनी वाहन थांबवून चर्चेचे आश्वासन दिले आहे.

आमदार संजय राठोड दिग्रस विश्रामगृहावर जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आले होते. वैभव नगरमधील भास्कर वाघमारे हा दिव्यांग युवक राठोडांच्या भेटीसाठी आपली समस्या घेऊन आला होता. भेट न झाल्याने वाघमारे याने चक्क झोपून आमदार संजय राठोड यांची गाडी शासकीय विश्रामगृहातून बाहेर निघता वेळी अडवली. ही घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली. वैभव नगरातील भास्कर वाघमारे हा दिव्यांग युवक राठोडांच्या भेटीसाठी आपली समस्या घेऊन आला होता.

यावेळी लागलीच पोलिसांनी वाघमारे यास उठवून आमदार राठोड यांच्याकडे घेऊन गेले. यावेळी भास्कर वाघमारे याने एकवेळ वैभव नगर येथे भेट देऊन नगरसेवकांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!