Share

हॉकी प्रो लीग: भारतीय महिला संघाकडून चीनचा ७-१ने पराभव

Published On: 

मुंबई : भारतीय महिला हॉकी संघाने हॉकी प्रो लीगमध्ये त्यांच्या पहिल्याच सामन्यात चीनचा ७-१ ने पराभव करत शानदार विजय मिळवला आहे. मस्कत मध्ये सुरु असलेल्या स्पर्धेची गोड सुरवात महिला संघाने केली आहे.

भारतीय संघाच्या विजयासाठी सुशीला चानू पुख्राम्बाम , नवनीत कौर, नेहा, वंदना कटारिया , शर्मिला देवी , गुरजीत कौर यांनी गोल केले. चीनकडून डेंग झ्यूचा ४३व्या मिनिटाला एकमात्र आला. भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाची रणनीती केली आणि ती प्रभावी ठरली. नवनीत कौरच्साया ५ व्या मिनिटाला आलेला पहिल्या गोलने संघाला एक चांगली सुरुवात करून दिली. भारतासाठी शर्मिला देवीने सर्वाधिक २ गोल केले.

भारताची कर्णधार आणि गोलरक्षक सवितानेही चीनला परतून लावण्यास चांगले प्रयत्न केले. पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवल्यानंतर चीनने लक्ष्यावर गोल करण्यास सुरुवात केली. मात्र भारताच्या गोलमध्ये सविताने चांगली डिफेन्स दाखवत गोल वाचवले. लीगचा पहिला सामना जिंकल्याने संघाच्या आत्मविश्वासात भर पडली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!