Share

भाजपला इतिहास कधीच माफ करणार नाही; विश्वजीत कदमांची टीका

Published On: 

🕒 1 min read

सांगली:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने विचारपूस करणे गरजेचे होते. पण तसे न करता त्यांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून पाप केले आहे. हुकूमशाही पद्धतीने मोदी सरकारने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्यांना इतिहास कधी माफ करणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

दरम्यान, कृषी कायद्यावरून संसदेत जोरदार रणकंदन सुरू असतानाच आज आंदोलक शेतकऱ्यांनी देशभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आलं असून, देशभरात तीन तास आंदोलन केलं जाणार आहे. कृषी संयुक्त किसान मोर्चाने याबद्दल शुक्रवारी माहिती दिली होती. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर आंदोलन केलं जाणार असून, कोणत्या वाहनांना जाण्यास मूभा दिली जाईल, याबद्दलही मोर्चानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनला पाठिंबा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!