नाशिक : काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलला वेग आला आहे. कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्यावर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पटोले यांनी राजीनामा सोपवल्यानंतर आता झिरवळ यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद असणार आहे.
पुढील प्रदेशाध्यक्ष हे अधिक आक्रमक असावेत यासाठी काँग्रेसच्या कमिटीचा आग्रह असल्याने नाना पटोले यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, काँग्रेसला आता उपमुख्यमंत्री पदाबाबत रस असल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे. यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मात्र अशात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असणारे उपमुख्यमंत्री पद ते सोडणे शक्य नसल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्ष कोणाला प्रदेशाध्यक्ष करतो किंवा कोणाला कुठले पद येते हा सर्वस्वी काँग्रेस पक्षाचा विषय आहे. दावा तर मुख्यमंत्रिपदासाठीदेखील करता येऊ शकतो, परंतु प्रत्यक्षात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत पक्षश्रेष्ठी ठरवतील तोच अंतिम निर्णय असेल, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- फिर्याद देण्यासाठी करावा लागतो ४० किमी चा प्रवास; २६ गावांचा भार २ पोलीस कर्मचाऱ्यावर
- शरजिल उस्मानीवर कारवाई करा; महाराष्ट्र भाजप योगी दरबारी
- गोवऱ्यांवर स्वयंपाक करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन
- विराट कोहली, रोहित शर्माच्या ‘या’ फोटोवर पडतोय मिम्सचा पाऊस
- ‘कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या भारताच्या कामगिरीसाठी डब्लूएचओने थोपटली पाठ !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
