बेंगळुरू: कर्नाटक राज्य सरकार मध्ये नेहमीच काही ना काही सत्ता नाट्य सुरू असते. तर राजीनाम्यावरून देखील एकमेकांवर टीका केली जाते. नुकतच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री येदियुरप्पा हे राजीनामा देणार असल्याचं भाष्य केलं होत. याला मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी युरप्पा म्हटले, ‘ सहा महिन्यांपासून ते मी राजीनामा देणार असल्याचे म्हणत आहेत. आता देखील ते मी राजीनामा देणार असल्याचं म्हणत आहे. पण जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे समर्थन आणि लोकांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी मुख्यमंत्री राहणार’ ,’माझ्यावर 100 गुन्हे दाखल करा मी लढत राहणार असे यावेळी येदियुरप्पा यांनी म्हटले.
दरम्यान, काही दिवसांपासून येदियुरप्पा यांच्या सरकार मध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर एक गट नाराज असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर या नाराज आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या बेंगलोर येथील निवासस्थानावर डिनर पार्टी ठेवण्यात आली होती. यावेळी देखील 30 पेक्षा अधिक आमदार उपस्थित नसल्याने सरकारची चिंता वाढू शकते.
महत्वाच्या बातम्या
- फिर्याद देण्यासाठी करावा लागतो ४० किमी चा प्रवास; २६ गावांचा भार २ पोलीस कर्मचाऱ्यावर
- शरजिल उस्मानीवर कारवाई करा; महाराष्ट्र भाजप योगी दरबारी
- गोवऱ्यांवर स्वयंपाक करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन
- विराट कोहली, रोहित शर्माच्या ‘या’ फोटोवर पडतोय मिम्सचा पाऊस
- ‘कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या भारताच्या कामगिरीसाठी डब्लूएचओने थोपटली पाठ !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
