Share

मोठी बातमी : राज ठाकरे यांना जामीन मंजूर !

Published On: 

मुंबई : 26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राज ठाकरे यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावरती जामीन मंजूर झाला आहे.

राज ठाकरेंना यापूर्वी 2018 आणि 2020 मध्ये समन्स काढण्यात आले होते. मात्र, त्यावेळी राज ठाकरे उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे राज ठाकरेंना वॉरंट काढलं गेलं. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित होते. राज ठाकरेंना वॉरंट काढल्यानं मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात वाशी टोलनाका परिसरात जमा झाले होते.

दरम्यान, राज ठाकरे येणार असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ग्रँड वेलकम केलं. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा नक्कीच मनसेला होईल अशी आशा मनसैनिकांना वाटत आहे. तर या प्रकरणाची पुढची सुनावणी ५ मेला होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!