🕒 1 min read
मुंबई:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनानं राजकीय चर्चेच वर्तुळ व्यापून टाकलं आहे. आज शेतकऱ्यांनी ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांकडून शेतकरी आंदोलनाबद्दल खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही असल्याचा आरोप केला जात आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसनं भाजपाला कंगना रणौतला पाठिंबा दिल्याचं स्मरण करून देत खडेबोल सुनावले आहेत.
आंदोलनात नक्षलवादी आणि देशद्रोही असल्याचं काही भाजपा नेत्यांनी म्हटलं होतं. यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपाला सुनावलं आहे. ‘देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वोतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलिसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?’ असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.
देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या #भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलीसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 6, 2021
महत्वाच्या बातम्या
- फिर्याद देण्यासाठी करावा लागतो ४० किमी चा प्रवास; २६ गावांचा भार २ पोलीस कर्मचाऱ्यावर
- शरजिल उस्मानीवर कारवाई करा; महाराष्ट्र भाजप योगी दरबारी
- गोवऱ्यांवर स्वयंपाक करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन
- विराट कोहली, रोहित शर्माच्या ‘या’ फोटोवर पडतोय मिम्सचा पाऊस
- ‘कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या भारताच्या कामगिरीसाठी डब्लूएचओने थोपटली पाठ !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
