Share

महानिर्मितीने रचला इतिहास, ६० वर्षातील सर्वाधिक वीज निर्मिती

Published On: 

मुंबई : देशातील एक मोठ्या वीजनिर्मिती कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या महानिर्मितीने मंगळवारी दुपारी चार वाजता एकूण १० हजार ४४५ मेगावॅट वीजनिर्मिती करून औष्णिक वीजनिर्मितीमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. यासोबतच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

वीजनिर्मितीमध्ये कोळसा व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचे असते. जर कोळशाचे व्यवस्थापन नीट करता आले नाही तर त्याचा सामना नागरिकांना करावा लागतो. पण महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोळसा व्यावास्थापनचे काम उत्तम रित्या करून दाखवले आहे. डॉ. राऊत यांनी ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील औष्णिक वीज केंद्राची उत्पादन क्षमता अर्थात प्लांट लोड फॅक्टर वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले. राज्य वीज नियामक आयोगाने वीज केंद्रांची उत्पादन क्षमता किमान ८५ टक्के असायला हवी असे बंधन घातले आहे. डॉ. राऊत यांनी ही क्षमता किमान ९५ टक्के गाठण्याचे लक्ष्य महानिर्मितीला आखून दिले. नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्यांनी वेळोवेळी आढावा घेतला. गुणवत्तापूर्ण कोळसा न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

डॉ. राऊत यांनी ६ जानेवारी २०२० रोजी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला त्यादिवशी महानिर्मितीचे एकूण वीज उत्पादन ६ हजार ८२१ मेगावॅट होते. यात ४ हजार ८०४ मेगावॅट औष्णिक वीजनिर्मितीचा समावेश होता. आज ९ मार्च २०२१ रोजी एकूण (पिक) वीज उत्पादन १० हजार ४४५ मेगावॅट असून यात ७ हजार ९९१ मेगावॅट औष्णिक वीजेचा समावेश आहे. वर्षभरात औष्णिक वीज उत्पादन जवळपास दुपटीने वाढले आहे तर एकूण वीज उत्पादन हे जवळपास ४ हजार मेगावॅट ने वाढले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!