Share

महाराणा प्रताप अवमान प्रकरणी राजकीय राजस्थानात वादंग

Published On: 

उदयपूर : राजस्थानातील वल्लभनगर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या एका युवक संमेलनात प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांच्या हस्ते तरुणांना वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या प्रतिमा देण्यात आल्या. त्या स्वीकारल्यानंतर मंचावर बसलेल्या पदाधिकारी आणि गौरवार्थींच्या पायांजवळ त्या प्रतिमा ठेवण्यात आल्या. त्यामुळे राजस्थानात वादंग निर्माण झाला आहे

सोशल मीडियावर भाजपच्या युवा संमेलनाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या. हा राजस्थानचा, मेवाडचा अपमान आहे असं अनेकांनी म्हटलं. या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया उपस्थित असताना असं घडल्यामुळे तर विरोधाला अजून धार चढली. भाजपने महाराणा प्रतापांचा अपमान केला असल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. भाजपला सत्तेचा अहंकार आला आहे असं राजकीय पक्षाच्या नेत्यांनी म्हणत निषेध केला. सामाजिक संघटनांनीही जोरदार विरोध केला.

राजस्थानमधील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि खासदार सी. पी. जोशी यांनी सर्वांत पहिल्यांदा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून जनतेची जाहीर माफी मागितली. नकळतपणे ही चूक झाली आहे त्याबद्दल आम्ही जनतेची माफी मागतो असं त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.

त्यानंतर राज्य भाजपच्या अधिकृत फेसबूक पेजवरून याबाबत माफी मागण्यात आली आहे. ‘महाराणा प्रताप संपूर्ण भारतवर्षासाठी आदरणीय आणि अभिमान वाटावं असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबद्दल आपणा सर्वांच्याच मनात प्रचंड आदर आहे. आमच्या चुकीबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो.’ हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांकडून ही चूक झाल्याचं स्पष्टीकरणही फेसबूक पानावर भाजपच्या प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे.

सध्या राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं सरकार आहे. वल्लभनगर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपने केलेली ही चूक काँग्रेसच्या पथ्यावर पडली आणि त्यांनी त्याचा जबरदस्त फायदा घेतला. देशात सत्तेत असलेल्या भाजपला अहंकार झाला असून त्यामुळेच ते वीरपुरुषांचा अपमान करत आहेत अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. वल्लभनगर विधानसभा निवडणुकीवर या घटनेचा किती परिणाम होतो हे बघावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!