Share

‘पंतप्रधानांनी लस घेतल्याने जनतेचा विश्वास वाढला; मी त्यांचं स्वागत करतो’

Published On: 

मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनच राज्यासह देशभरात कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली होती. यानंतर, कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना आटोक्यात आल्यानंतर जनजीवन सुरळीत झाले, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्य सरकार वेळीच परिस्थीवती नियंत्रणात पावले उचलत आहे.

दरम्यान, देशात लसीकरण सुरु झाले असून राजकीय नेत्यांनी लस घेतली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राजपाल भगतसिंग कोशारी तर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील कोरोना लस घेतली आहे.

‘पंतप्रधानांनी लस घेतल्यामुळे आता जनतेचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो. त्यांनी लस घेतली त्यावर विश्वास दाखवला हे महत्त्वाचं आहे. अमेरिकेतही जेव्हा जो बायडेन यांनी लस घेतली, तेव्हा तेथील जनतेलाही ही लस आपलं रक्षण करेल असा विश्वास वाटला. आपल्या देशात पंतप्रधानांनी लस घेतली हे कौतुकास्पद आहे,’असं राऊत म्हणाले होते. त्यानंतर आज संजय राऊत यांनीही लस घेतली. मी ही लस घेतली आहे त्यामुळे माझा हात दुखतो आहे काळजी घेत आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत

मुंबईकरांनी नियमांचं पालन केलं नाही. मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत नियमाचे पालन करा. त्यामुळे सरकारवर खापर फोडता येणार नाही लॉकडॉऊन पुन्हा केलेला आपल्याला परवडणारा नाही.त्यामुळे निर्बंध स्वतःहून पाळले पाहिजेत.

 

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!