Share

‘इंग्लंड भारताला भारतामध्ये हरवू शकतो, आम्हाला भारताविरुद्ध खेळवा’

Published On: 

रायपूर : भारतामध्ये सध्या क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी. सध्या  भारतात सध्या भारत विरुद्ध इंग्लंड सामने सुरु आहेत तर दुसरीकडे  इंडिया रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी 20 स्पर्धा  सुरु आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज 2021 मधील एका चुरशीच्या मॅचमध्ये इंग्लंड लिजेंड्सने भारत लिजेंड्सचा 6 रनने पराभव केला. 40 वर्षांच्या केव्हिन पीटरसनची आक्रमक खेळी हे या मॅचचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.

या विजयानंतर इंग्लंड लिजेंड्स टीमचा कॅप्टन केव्हिन पीटरसन याने इन्स्टाग्रामवर एक मेसेज लिहिला आहे. पीटरसनने आपल्या पोस्ट मध्ये  टीममधील सर्व खेळाडूंचा फोटो शेअर केला आहे. आणि लिहिले, ‘इंग्लंड भारताला भारतामध्ये हरवू शकतो. काय जबरदस्त मॅच होती. इंग्लड सिलेक्टर्स, आम्ही सर्व भारताविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध आहोत.’ असे पीटरसनने इंग्लंडच्या निवड समितीला सुचवले आहे.

https://www.instagram.com/p/CMNQF3plVsi/?utm_source=ig_web_copy_link

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका भारताने 3-1 या फरकाने जिंकली आहे. तर पाच मॅचच्या टी20 मालिकेला शुक्रवारपासून अहमदाबादमध्ये सुरुवात होत आहे. या मालिकेनंतर तीन मॅचची वन-डे मालिका पुण्यामध्ये खेळवली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!