Share

नरेंद्र मोदी स्टेडीयम मध्ये होणार टि-२० विश्वचषक? ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार स्पर्धा

Published On: 

मुंबई : आयपीएल पाठोपाठ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टि-२० विश्वचषक स्पर्धेचे सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर होण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी बीसीसआयला आयपीएल स्पर्धेचे आयोजन यशस्वीरीत्या करणे गरजेचे आहे.

येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४व्या पर्वाची सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. तर आयपीएल स्पर्धेचा अतिंम सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर येथे होईल. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टि-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्याच्या तयारीचा पाया आयपीएल आयोजनातून रचला जाणार आहे. यंदा कोरोना व्हायरसमुळे समोरील आव्हानं अधिक वाढली आहेत. अशात बीसीसीआयला आयपीएलच्या यशस्वी आयोजन करावेच लागेल.

आयपीएल २०२१साठी निवडण्यात आलेल्या सहा स्टेडियमवरच टि-२० विश्वचषक स्पर्धेचे सामने खेळवण्यात येतील अशी माहिती समोर आली आहे. आयसीसी नियमानुसार विश्वचषत स्पर्धेसाठी निवडलेल्या ठिकाणांची घोषणा सहा महिने आधीच करावी लागते. त्यामुळे बीसीसीआय तशी घोषणा लवकरच करेल, अशी अपेक्षा आहे. टि-२० विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनल व फायनलवरून चर्चा सुरू आहे. चेन्नई व बंगळुरू येथे सेमीफायनलचे सामने आयोजीत करण्याचा मानस बीसीसीआयचा आहे तर अहमदाबाद येथे विश्वचषक स्पर्धेची फायनल खेळवली जाईल.

महत्वच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!