IND vs WI: सामना संपल्यानंतर रोहितने घेतली ईशान किशनची शाळा

मुंबई: भारतीय संघाने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव करत विजयी सुरुवात केली. एकदिवसीय मालिका ३- ० ने जिंकल्यानंतर टीम इंडियाने टी-20 मध्येही आपला शानदार खेळ सुरू ठेवला आहे. पहिल्या T20 सामन्यात रोहित शर्माने १९ चेंडूत ४ चौकार आणि ३ सिक्सरसह ४० धावा केल्या, तर त्याचा सलामीचा साथीदार इशान किशनने ३५ धावा काढण्यासाठी संघर्ष केला. सामना संपल्यानंतर रोहित ईशानला काहीतरी बोलताना दिसला आणि ईशान हात मागे ठेवून विद्यार्थ्यासारखा उभा होता.

ईडन गार्डन्सच्या मैदानावर यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने ४२ चेंडूत ३५ धावा केल्या. या संपूर्ण डावात किशन धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला. त्याच्या खेळीमुळे कर्णधार रोहितही चांगलाच संतापला होता. सामना संपल्यानंतर रोहित शर्माने इशान किशनशी खूप वेळ बोलताना दिसला. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी७ ओव्हरमध्ये ६८ धावांची भागीदारी केली, ज्यामध्ये कर्णधार रोहितचा सर्वात मोठा वाटा होता. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहितने इशान किशनवर मोकळेपणाने बोलला.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इशान किशनच्या फलंदाजीबद्दल सांगितले की, ‘मी त्याच्याशी खूप दिवसांपासून बोलत आहे, जेव्हा तो मधल्या फळीतील फलंदाज म्हणूनही खेळला होता. तेव्हा त्याला संथ खेळपट्टीवर शॉट्स खेळताना त्याला त्रास होत होता. मी त्याचाशी बोलून त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत होतो, जेणेकरून येत्या सामन्यांमध्ये तो अशा परिस्थितीत अडकला तर मध्येच चौकार मारून तो स्वत:वरील दबाव दूर करू शकेल.” किशनने वेस्ट इंडिजविरुद्ध ४२ चेंडूत केवळ ४ चौकार मारले. रोहितचा इशानला समजावतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या