Share

 पुणे शहरातील राजकारण तापले ; सत्ताधारी भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीची थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार

Published On: 

पुणे : येत्या काहीच दिवसात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षातच पुणे महानगरपालिकेसाठी चुरशीची लढत होणार आहे. दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपाच्या मालिका सुरु झाल्या आहेत. त्यातच आज पुणे शहर राष्ट्रवादी पक्षाने भारतीय जनता पक्षाची लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे.

पुणे महापालिकेतील विविध प्रकल्पांमध्ये टेंडर देण्यामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने  लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाने पुणे महानगरपालिकेच्या कामकाजात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. भारतीय जनता पक्षाने पुणे मनपातील विविध प्रकल्पांमध्ये टेंडर देण्यामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीसमोर गेल्या ५ ते ६ महिन्यात मोठ्या बजेटचे अनेक विषय आले आहेत. त्यात कित्येक कोटींचे बजेट आले, पुन्हा सत्तेत येऊ की नाही याची शाश्वती नसल्याने मुद्दाम काही प्रकल्प कागदावर आणले जात आहेत.6 हजार कोटींच्या प्रकल्पांची चौकशी करण्याची आम्ही मागणी केलीय स्थायी समितीची मुदत काही दिवसात संपणार आहे त्यासाठी एवढी घाई चाललीय असा आरोप पुणे शहर राष्ट्रवादीने केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!