मुख्यमंत्री चन्नी यांच्या टीकेवर योगी आदित्यनाथांची प्रतिक्रिया; म्हणाले…

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सामने बघायला मिळत आहे. असे असतांनाच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Sing Channi) यांनी युपी, बिहारच्या भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. चन्नी यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला सुरुवात होण्याचे चिन्हे दिसू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना योगी आदित्यनाथ म्हणाले की,‘पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी संत रविदास यांच्याकडून प्रेरणा घेत असे विधान करण्यापासून स्वत:ला रोखायला हवं होतं. चन्नी हे रवीदास जयंतीच्या निमित्ताने वाराणसीत आले होते. जर त्यांनी त्यांच्याकडून काही प्रेरणा घेतली असती तर असे वक्तव्य केले नसते’, असे योगी म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘गांधी आणि नेहरुंच्या नावाखाली काँग्रेस सतत देशाची फसवणूक करत आहे. भाषावाद, नक्षलवाद,जातीवाद, क्षेत्रवाद, दहशतवाद या सर्व जखमा काँग्रेसने देशाला दिल्या आहेत’, असा घणाघातही योगी यांनी केला.

महत्वाच्या बातम्या: