नवी दिल्ली – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी योग्य असल्याचं मोठं वक्तव्य केलं. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच एन्काऊंटर पॉलिसीचे समर्थन केल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असून काहीजण त्यांच्यावर टीका करत आहेत तर काहीजण त्यांचे कौतुक देखील करताना दिसून येत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्र्यांची नुकतीच सोमवारी सर्व पोलीस स्थानकांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी या एन्काऊंटर पॉलिसीचे समर्थन केले तसेच महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांच्याविरोधात कठोरपणे कारवाई करण्याचे निर्देशही त्याने दिले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने एन्काऊंटर पॉलिसीचे समर्थन करणे योग्य आहे का असा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे.
याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली त्यानुसार,ते म्हणाले आहेत की, आजकाल गुन्हेगार पोलिसांच्या कचाट्यातून पळ काढत आहेत आणि एन्काऊंटरसारख्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे एक पॅटर्न बनत आहे का?, मी त्यांना हे पोलिसिंग पॅटर्न असायला हवं असं म्हटलं, असं वक्तव्य सरमा यांनी केलं. बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगारानं पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांकडून हत्यार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांना गोळी चालवावी लागेल. परंतु छातीवर नाही आणि कायद्यानं म्हटलं आहे, तुम्ही पायावर गोळी मारू शकता. आम्हाला आसाम पोलिसांना देशातील सर्वोत्तम पोलीस दल बनवायचे आहे असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी पदाधिकाऱ्यांना अत्यंत प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने आपले कर्तव्य बजावत असताना राजकीय दबाव किंवा इतर मोहांना बळी पडू नये, असे आवाहन केले. जनतेला अनुकूल सेवा देण्याचा प्रयत्न करीत पोलिसांना आरोग्यासाठी निरोगी जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, सरमा यांनी केलेल्या या वक्तव्याचे अनेक मंडळी स्वागत करत असले तरीही यामुळे राज्यात फेक एन्काऊंटरचे प्रमाण देखील वाढू शकेल अशी देखील भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आपल्या अधिकारांचा वापर करून मुद्दाम फेक एन्काऊंटर करू शकतात असं देखील सांगितले जात आहे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे मात्र त्यासाठी न्यायालय आहे पोलीस हे स्वतः न्यायाधीशाच्या भूमिकेत असता कामा नये हे देखील याठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बाजीराव ते कपील देव’ अष्टपैलु रणवीरचे ३६व्या वर्षात पदार्पण!
- सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नारायण राणेंना दिले जाणार मंत्रिपद ?
- नारायण राणे होणार केंद्रीय मंत्री ?, दिल्लीहून आले तातडीचे बोलावणे
- निवड समिती अध्यक्षांच्या हट्टामुळे पृथ्वी शॉ इंग्लंड दौऱ्याला मुकला
- आयपीएल २०२१ मध्ये श्रेयस अय्यर करणार पुनरागमन ; दिल्लीच्या कर्णधारपदावर दिलं उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
