औरंगाबाद : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना तज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा धोकाही दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकारने तसेच स्थानिक प्रशासनाने पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र अनेक ठिकाणी सत्ताधारी किंवा जबाबदार लोकप्रतिनिधींकडून या नियमांना केराची टोपली दाखवण्याचे पहायला मिळते. औरंगाबादमध्येही अशीच एक घटना घडली आहे.
जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विकेंड लॉकडाऊन असतानाही खासदारांच्या उपस्थितीत मध्यरात्रीपर्यंत कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच हा कार्यक्रमात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून त्यांचे सर्व नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत बिनधास्त सुरू होता. यामुळे आपल्या राज्यात सरकार आणि प्रशासन निर्बंध सर्वसामान्य लोकांवर लादते अशा प्रकारच्या जबाबदार लोकप्रतिनिधींसाठी ते नियम नसतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राज्याप्रमाणे औरंगाबादमध्ये सध्या विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. असे असताना देखील शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कव्वालीच्या कार्यक्रमाला शेकडोंची गर्दी जमली होती. यावेळी कोरोनाविषयक कुठलाही नियम त्याठिकाणी पाळण्यात आला नाही. विशेष म्हणजे औरंगाबादचे सुशिक्षित खासदार इम्तियाज जलील देखील या कार्यक्रमात रात्री सहभागी होते. त्यामुळे जबाबदार लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारे नियम मोडत असतील तर सर्वसामान्य जनतेने काय करावे ? तसेच जर लोकप्रतिनिधींकडून नियम पाळणे होत नसतील तर त्यांनी ते नियम बनवूच नये असा सुर नागरिकांमध्ये उमटत आहे.
या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नासेर सिद्दीकी, आयोजकांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र खासदार या कार्यक्रमाला उपस्थित असताना देखील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करणार – जिल्हाधिकारी
यासर्व घटनेबाबत आमच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यीशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात नियम हे सर्वांसाठी समान आहेत. माझ्याकडे कार्यक्रमाचे फुटेज आले की मी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘केंद्राचा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा, आम्ही दुसरा आणणार’
- ‘स्वप्निलची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारने केलेला मर्डर आहे!’
- ‘..अन्यथा हेच तरूण तुमच्या गळ्याला फास लावतील’, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘अधिवेशन कसे चालवायचे हे आता संज्या सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे’
- मुख्यमंत्री होऊ न देण्याचे ओवेसींचे आव्हान योगींनी स्वीकारले, म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

