औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्यावर शनिवारी रात्री पैस्यांची उधळण झाली. या कार्यक्रमात आलेल्या ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना लक्ष करीत खासदारांवर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला.
वेगवेगळ्या करणाने खासदार इम्तियाज जलील हे सध्या सतत वादाच्या भवऱ्यात सापडत आहे. अब्दीमंडी येथे एका मुशायऱ्या दरम्यान कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला. एकीकडे गरिबांसाठी झगडतो असा धिंडोरा पिटणाऱ्या खासदाराला स्वतःच्या अंगावर पैस्यांचा पाऊस पडत असताना गरिबांची आठवण तर बाजूलाच, परंतु असा उद्योग करणाऱ्या कार्यकर्त्याना जलील यांनी साध बाजूला देखील नाही सारल. त्यात या कार्यक्रमात असलेल्या ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
परंतु, खासदारांनी पोलीस तसेच जिल्हा प्रशासनावर दबाब टाकून स्वतःला बाजूला सारले का? असा सवाल मनसे जिल्हाध्यक्षांनी केला. लोकांना भेटायला वेळ नसलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासदारांची बाजू योग्य सांभाळल्याचा आरोप देखील सुहास दाशरथे यांनी केला. तसेच खासदारांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी देखील सुहास दाशरथे यांनी या वेळी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘केंद्राचा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा, आम्ही दुसरा आणणार’
- ‘स्वप्निलची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारने केलेला मर्डर आहे!’
- ‘..अन्यथा हेच तरूण तुमच्या गळ्याला फास लावतील’, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘अधिवेशन कसे चालवायचे हे आता संज्या सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे’
- मुख्यमंत्री होऊ न देण्याचे ओवेसींचे आव्हान योगींनी स्वीकारले, म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

