Share

राज ठाकरेंसह मनसेच्या नेत्यांनी केली पवारांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना !

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे.शरद पवार यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच विविध नेत्यांनी त्यांची विचारपूस केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनद्वारे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. यानंतर पवारांनी त्यांचे आभार देखील मानले आहेत. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार!’ असं ट्विट पवारांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून करण्यात आलं आहे.

यासोबतच, मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी देखील पवारांच्या स्वास्थ्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. ‘सन्मानिय पवार साहेब यांची प्रकृती लवकरात लवकर उत्तम होवो हिच सदिच्छा.’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवार यांची फोनद्वारे विचारपूस केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!