🕒 1 min read
औरंंगाबाद : रेल्वे प्रवाशाचा मोबाइल चोरणा-या शाहीद आलम मोहम्मद हारुण (वय २१, रा. गिधा, चौबेटोल ता; चनपटीया जि. पश्चिम चंपारण बिहार,ह.मु.औरंगाबाद) याला लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले असून त्याची हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रूहिना अंजूम यांनी दिले आहेत. दरम्यान, अटकेत असेला शाहीद आलम मोहम्मद हारूण हा समृध्दी महामार्गाच्या कामावर क्रेशर चालविण्याचे काम करतो अशी माहिती लोहमार्ग पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे.
शिवाजी चौल ता. हातगाव, जि. नांदेड येथे राहणारा महेश अशोकराव कन्नलवार (वय १८) हा २८ जानेवारी रोजी काचीगुडा सब्रीमाला एक्सप्रेसने कल्याण ते नांदेड असा प्रवास करित होता. रेल्वे जालना येथे थांबली असता चोरट्याने हातचालाखिने त्याच्या खिशातील आठ हजारांचा मोबाइल चोरुन नेला.
प्रकरणात औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर लोहमार्ग पोलिसांनी तपासाची चव्रेâ फिरवून रेल्वेतून मोबाईल चोरणाNया शाहीद आलम मोहम्मद हारुण (वय २१, रा. गिधा, चौबेटोल ता; चनपटीया जि. पश्चिम चंपारण बिहार,ह.मु.औरंगाबाद) याला गजाआड केले.
महत्त्वाच्या बातम्या
- बाप रे! ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता उत्तरप्रदेशात आढळला यल्लो फंगसचा रुग्ण
- ‘दहा कोटी द्या, अन्यथा नांदेडचे कलेक्टर ऑफिस उडवून टाकेल!’
- ‘केंद्रावरील आरोपांबाबत कार्यकारी संचालकांचे वक्तव्य कंपनीचे नाही’, सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा
- नांदेडच्या महिलेला फेसबूकवरील मैत्री पडली महागात, अमेरिकेतील दोघांनी लाखोंना फसवले
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

