नवी दिल्ली : विविध मार्गांतून पाकिस्तानमधून भारतात अवैध तस्करी सुरूच असते. अनेकदा समज देऊनही पाकिस्तान ऐकायचे नाव घेत नाहीये. पुरावा दिला तर तो मी नव्हेच असे म्हणत हात वर करण्याची पाकिस्तानची जुनी खोड आहे. कुत्र्याचे शेपूट वाकडेच या प्रमाणे पाक नेहमीच कुरापत्या करत असतो. मात्र, आता पाकमधून होणाऱ्या तस्करीचा मोठा भांडाफोड झाला आहे. अरबी समुद्रातील गुजरातच्या तटीय भागात गुरुवारी भल्या पहाटे एका नौकेतून आलेल्या पाकिस्तानच्या ८ तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. या तस्करांकडून तब्बल ३०० कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले.
गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी गुजरातमध्ये घुसखोरी करणार असल्याचे गोपनीय वृत्त मिळाले. त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त पथकाने सीमावर्ती कच्छ जिल्ह्याकडे धाव घेतली. येथील जखाऊ बंदराजवळ अभियान राबवित पाकमधून आलेल्या मच्छीमार नौकेला ताब्यात घेतले. या नौकेत असलेल्या आठ तस्करांना यावेळी अटक करण्यात आली. त्यांच्याकडे सुमारे ३० किलो हेरॉईन आढळून आले. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात ३०० कोटी एवढी किंमत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकच्या आठ तस्करांना आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा रेषेवर (आयएमबीएल) अटक करण्यात आली. देवभूमी असलेल्या द्वारका जिल्ह्याचे पोलीस आणि वरिष्ठ एटीएस अधिकाऱ्यांना पाकमधून मादक पदार्थांची तस्करी होत असल्याचे गुप्त वृत्त मिळाले. त्यानंतर त्यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या सीमेवर सातत्याने आगळीक करणाऱ्या पाकिस्तानने आता समुद्री मार्गे अमली पदार्थांची तस्करी सुरू केली आहे. गेल्या वर्षभरात तब्बल १.६ टन अर्थात ५,२०० कोटी रुपयांचे मादक पदार्थ हस्तगत करण्यात यश आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- हद्दच झाली! रेमडेसिवीरच्या उपलब्धतेवरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद
- लेटरवॉर! धनंजय मुंडेंनी आव्हान दिले पंतप्रधानांना लिहा पत्र, पंकजांनी पाठवले मुख्यमंत्र्यांना
- ‘भाऊ, ‘तो’ हक्क फक्त तुम्हालाच आहे!’, पंकजांचा धनंजय मुंडेंवर पलटवार
- संजय राऊतांचे ‘ते’ वक्तव्य कंपाउंडरने घेतले मनावर, डॉक्टर बनून केले कोरोना रुग्णांवर उपचार
- ‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट! बातमी प्रकाशित होताच बीडच्या खा.प्रितम मुंडेनी घेतला कोरोनाचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

