बीड : बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सद्यस्थितीत अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. परंतू बीड जिल्ह्याच्या भाजप खासदार प्रितम मुंडे एवढ्या अडचणीच्या काळात कोठेही दिसत नाहीयेत.
याबाबत ‘महाराष्ट्र देशा’ने आवाज उठवत ‘बीडच्या भाजप खासदार डॉ.प्रितम मुंडे हरवल्या आहेत!’अशी बातमी प्रकाशित केली होती. या बातमीनंतर खडबडून जागे होते खा.मुंडे यांनी बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णालयात मिळणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेण्यासाठी पीपीई किट घालून त्यांनी कोविड कक्षातील रुग्णांशी संवाद साधून विचारपूस केली.
या संबंधी डॉ. प्रीतम मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे, आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.तसेच रुग्णांशी संवाद साधून लिक्विड ऑक्सिजन प्लांट आणि स्वयंपाक गृहाची पाहणी केली.’
कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे,आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.तसेच रुग्णांशी संवाद साधून लिक्विड ऑक्सिजन प्लांट आणि स्वयंपाक गृहाची पाहणी केली. pic.twitter.com/8p1s8607W6
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) April 14, 2021
यावेळी त्यांनी कोविड कक्षातील रुग्णांशी संवाद साधून विचारपूस केली. तसेच ऑक्सिजन प्लँट आणि स्वयंपाकगृहाची पाहणी केली. रुग्णालयातील सामान्य रुग्ण व कोरोनाबाधित रुग्णांची वर्गवारी करणे, कमी प्रमाणात लक्षण असलेल्या रुग्णांचे विभाजन करून त्यांना इतरत्र हलवणे, ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सच्या उपलब्धतेबाबत नियोजनाच्या सूचना त्यांनी संबंधित आराेग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. रुग्णालय परिसरातील नर्सिंग होस्टेलच्या इमारतीतील २७५ बेड्सच्या कोविड सेंटरची पाहणी करताना त्यांनी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेचा रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आढावा घेतला.
महत्वाच्या बातम्या
- चाकूर तालुक्यात १०० बेड रुग्णालय करीता प्रस्ताव सादर करा- अमित देशमुख
- अचानक जाग आली की बाहेरच्या गोष्टीची माहितीच नसते, धनंजय मुंडेंचे पंकजांना प्रत्युत्तर
- ‘ये राऊत की खुर्सी लेकर ही मानेगी’ ; कंगणाच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
- प्राध्यापक कॉपी पुरवतात, अश्या केंद्रावर कारवाई करणार : डॉ. योगेश पाटील
- ठाकरे सरकारचा गलथान कारभार, मोफत शिवभोजन थाळीसाठी गरिबांना मोजावे लागले पैसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

