पुणे : गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये शिवसेना नेत संजय राऊत यांनी एक मजेशीर वक्तव्य केले होते. राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेताना राज्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आणल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते. कौतुकाच्या ओघातल त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला देखील तुम्ही सल्ला द्यायला हवा, असा सल्ला ठाकरेंना दिला होता. त्यानंत राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे काय आहे? इकडून तिकडून गोळा केलेली माणसेच आहेत. त्यामध्ये डॉक्टर असले तरी मी स्वतः कधी डॉक्टरकडून औषधे घेत नाही. मी कंपाऊंडरकडून औषधे घेतो, असे विधान राऊत यांनी केले होते. कंपाऊंडरला डॉक्टरपेक्षा जास्त समजते असा दावा त्यांनी केला होता.
मात्र, आता एका कंपाऊंडरने राऊत यांचे हे विधान खूपच गांभिर्याने घेतल्याचे दिसत आहे. कारण, पुण्यात कंपाउंडर म्हणून काम करणाऱ्या भामट्याने डॉक्टर बनून अनेकांवर उपचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नगर रस्त्यावर शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तो रुग्णांना तपासत होता. तसेच त्याने हॉस्पिटलजवळ असलेला गाळा भाड्याने देण्यासाठी एकाकडून ३० लाख रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्याने अनेक कोरोना रुग्णांवर उपचार केल्याचे उघडकीस आले आहे.
यामुळे प्रकरण आले समोर
याप्रकरणी चंदन नारखेडे यांनी रांजणगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश किसन पाटील ऊर्फ मेहमूद फारुक शेख (रा. पीर बुऱ्हाणपूरनगर, जि. नांदेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पाटील याने नारखेडे याच्याकडून ३० लाख रुपये गाळा भाड्याने देण्यासाठी घेतले होते. त्यापैकी ६ लाख रुपये त्याने नारखेडे यांना परत दिले. मात्र, उर्वरित २४ लाख रुपये परत दिले नाही.
शेख हा १२ वी नापास असून नांदेड येथे एका डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून काम करत होता. उपचार पद्धती शिकून त्याने २ वर्षांपासून डॉ. महेश पाटील या बनावट नावाने शिरूर येथे मोरया रुग्णालय सुरू केले. २२ बेडच्या या रुग्णालयात त्याने कोरोना उपचारांसाठी स्वतंत्र कक्षसुद्धा सुरू केला. मेडिकल बिलाच्या नावाखाली तो रुग्णांच्या नातेवाइकांकडून हजारो रुपये उकळत होता. मात्र, भागीदारासोबत वाद झाल्याने प्रकरण पोलिसांत गेले.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट! बातमी प्रकाशित होताच बीडच्या खा.प्रितम मुंडेनी घेतला कोरोनाचा आढावा
- अचानक जाग आली की बाहेरच्या गोष्टीची माहितीच नसते, धनंजय मुंडेंचे पंकजांना प्रत्युत्तर
- ‘ये राऊत की खुर्सी लेकर ही मानेगी’ ; कंगणाच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
- प्राध्यापक कॉपी पुरवतात, अश्या केंद्रावर कारवाई करणार : डॉ. योगेश पाटील
- ठाकरे सरकारचा गलथान कारभार, मोफत शिवभोजन थाळीसाठी गरिबांना मोजावे लागले पैसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

