कोल्हापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून या भागातील पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील पूरग्रस्तांना पंचनामे झाल्यानंतरच मदत केली जाणार अशी घोषणा केली आहे. तसेच याबाबतीत मंत्रिमंडळात निर्णय घेतल्यावरच मदतीची घोषणा केली जाणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २०१९ च्या देवेंद्र फडणवीसच्या काळातील पूरस्थितीदरम्यान करण्यात आलेल्या जीआरप्रमाणे मदत केली जाणार असल्याचे म्हटले होते. तसेच या महापुराच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठ दिवसांनी आले होते, टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.
सध्या तळीयेला पोहोचायला रस्ता नाही. जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी तुंबले आहे. पाणी ओसरायला वेळ लागत नाही. मात्र पाणी ओसल्याशिवाय पंचनामे होणार नाहीत, त्यामुळे पंचनामे झाल्यावरच मदत दिली जाणार. हा सर्व आर्थिक योजनेचा भाग असल्याने पंचनामे होणे महत्त्वाचे असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळात मदतीची घोषणा होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे तांत्रिक अडचण होणार नाही. केंद्र सरकारचे निकष ठरलेले आहेत. त्यानुसार एकेरी मदत किती द्यायची यावर विचार होईल. असेही हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या बेशरमपणाचा कळस, मदत पोहचण्याआधी जाहिरात पोहोचली-भाजपची टीका
- सोनू सूदने केला ढाबा सुरु; पाहायला मिळाला चपाती तयार करताना
- माहीचा ‘तो’ लुक सोशल मीडीयावर तुफान व्हायरल
- श्रीलंका दौऱ्यातील अपयशी कामगीरीमुळे संजुचे करिअर धोक्यात
- पृथ्वीच्या संघातील पुनरागमनामुळे कर्णधार धवनचीच जागा धोक्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

