Share

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांची मागणी

Published On: 

औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात तसेच इतर ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदारी डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी औरंगाबादचे निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना निवेदनही दिले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ३० ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाला होता. या अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील तसेच इतर ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये कपाशी, मका, सोयाबीन, तूर या पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच पुरामुळे शेतकऱ्यांची जनावरे देखील वाहून गेलेली आहेत. अतिवृष्टीमुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. तसेच विहिरींचेही नुकसान झाले असल्याचे डॉ. काळे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

या संदर्भात डॉ. कल्याण काळे यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी देखील केली. त्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संबंधीचे पत्र पक्षातील वरीष्ठ नेत्यांनाही पाठवण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!