मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. तालिबान विषयी आपले मत व्यक्त करताना जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल या संघटनांवर देखील टीका केली आहे. तालिबान हे जंगली असून त्यांचे कृत्य निंदनीय आहे. भारतात आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान सारखेच आहेत असं म्हटलं होते.
यावरुन आता शिवसेनेचे मुखपत्र सामनातून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. तर भाजपचे आमदार राम कदम यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. राम कदम यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना आणि जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे. राम कदम म्हणतात, ”संघाची तुलना तालिबान सोबत करणं चुकीचं असल्याचे शिवसेनेनं हे स्वीकारलं आहे. जावेद अख्तर यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीचे विधान चुकीचं आहे. आम्ही त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही,”
”शिवसेना त्यांच्यावर कारवाई का करीत नाही. त्यांना अटक करण्यापासून शिवसेनेला कोणी रोखलं आहे. याचं उत्तर सत्तेत बसलेल्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला द्यावे लागेल. जावेद अख्तर यांना माफी मागावी लागेल. जावेद अख्तर यांनी भारतातील व्यवहार पाहिला आहे. त्यांनी तालिबान येथील व्यवहार पाहिलेला नाही. एकदा त्यांनी तेथे जावं. तेथील तालिबानी व्यवहार पाहावा, मग त्यांना आपोआप सद्बुध्दी सुचेल. त्यांनी हात जोडून माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी राम कदम यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मनी हाईस्ट’मधील ‘या’ भूमिकेत पंकज त्रिपाठीला पाहून चाहते भडकले
- ‘गरीबांची मुले शिकली, मोठी झाली, उच्च विद्या विभूषित झाली तरच त्यांचे जीवनमान उंचावेल’
- अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढणार; ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

