🕒 1 min read
नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात सध्या सातत्याने अतिवृष्टी होत आहे. कोकणनंतर आता मराठवाड्यावर पावसाचे संकट कोसळले आहे. त्यामुळे आता केंद्राने शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात सैल करावा अशी मागणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान यावेळी त्यांनी यावेळी त्यांनी पंचनामे झाल्यावर ओल्या दुष्काळाबाबत निर्णय घेण्यात येईल. येत्या आठ दिवसांत पंचमाने पूर्ण केले जातील. अतिवृष्टी संदर्भात प्रत्येक कॅबिनेटच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चर्चा होते असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तर भाजपने या मुद्द्यावर राजकारण करू नये असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील एकूण ३५२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टी संदर्भात प्रत्येक कॅबिनेटच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चर्चा होते असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील दरेकर या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांची जी भूमिका आहे तीच आमचीसुद्धा आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीवर कोणी राजकारण करू नये. असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- सहकारी चळवळीसाठी अमित शहांचे योगदान चांगलं राहील- शरद पवार
- कथित ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदमांना फोनवर बोलणारे प्रसाद कर्वे आहेत तरी कोण?
- फडणवीसांना शिवसेना नेता भेटला, अन् देगलूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला!
- ‘कानून वापसी नहीं तो घर वापसी नही’, कृषी कायद्यावरून टिकैत यांचा केंद्राला इशारा
- ‘तो माझा आवाज नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी करा’, प्रसाद कर्वेंची मागणी


