Share

औरंगाबाद पालिकेत ३४ सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी, उर्वरित ३६ जणांचीही लवकरच होणार नियुक्ती!

Published On: 

औरंगाबाद : लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार औरंगाबाद महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील मयत, सेवानिवृत्त, स्वेच्छा निवृत्त ५० कर्मचाऱ्यांपैकी ३४ कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने निवड समितीने त्यांना सफाई कामगार म्हणून नोकरीत सामावून घेतले असून ३६ कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने यांच्या नियुक्त्या प्रलंबित असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली असताना औरंगाबाद मनपाने सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देत एक आदर्श घालून दिला आहे.

लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगाराच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवड समितीची बैठक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली १८ मार्चला निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत ७० कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी अर्ज आले. त्या अर्जातील कागदपत्रांची तपासणी करून नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

७० कर्मचाऱ्यांपैकी ३४ कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना २६ एप्रिल २०२१ रोजी सफाई कामगार म्हणून नियुक्ती देण्यात आली. तर ३६ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांनी वारस प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने त्यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत. या कर्मचारी निवड समितीमध्ये अध्यक्ष म्हणून महानगरपालिका आयुक्त प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, अतिरिक्त आयुक्त बी .बी. नेमाने, विधी सल्लागार अपर्णा थेटे, मुख्य लेखा अधिकारी डि .के .हिवाळे, आस्थापना सहाय्यक उपायुक्त विक्रम दराडे यांचा समावेश आहे. अशी माहिती आस्थापना अधिकारी विक्रम दराडे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!