🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेटपटु हे मैदानातील कामगीरी व्यतिरीक्त खाजगी आयुष्यातील अनेक घडामोडीमुळे सतत चर्चेत असतात. गेल्या काही दिवसात बीसीसीआय आणि महिला क्रिकेटपटु या दोन्हीच्या बाबतीत एक विरोधी भूमिका तयार झाली आहे. यादरम्यान भारतीय संघाच्या एका महिला क्रिकेटपटु स्मृती मंधानाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे स्मृती चर्चेत आली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना ही सध्या आगामी इंग्लंड दौऱ्याच्या तयारीला लागली आहे. स्मृती सध्या इंग्लंड दौऱ्याच्या तयारीत व्यस्त असताना तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक जुना व्हिडिओ शेअर केला. स्मृती या व्हिडिओमध्ये स्वतः रोलर चालवताना दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे व्हिडिओला, ‘सकाळी सकाळी मैदानावरील काम ‘ असे लिहत आत्मनिर्भर असा हॅशटॅगही स्मितीने लिहीला आहे. २४ वर्षीय स्मितीला बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षीक करारात पहिल्या गटात स्थान दिले आहे.
https://www.instagram.com/p/CPTAMCrhZwH/
या गटात स्मृतीबरोबर हरमनप्रीत कौर आणि पूनम यादव यांनाही या वर्गात स्थान देण्यात आले आहे. या गटात सहभागी असलेल्या खेळाडूंना वर्षाला ५० लाख रुपये मिळतील. पुढील महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडमध्ये महिला संघ तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. या दौऱ्यासाठी घोषीत करण्यात आलेल्या तिन्ही संघात स्मृतीला स्थान देण्यात आले आहे. या दौऱ्यात स्मृती टी-२० संघाची उपकर्णधार असेल.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, संभाजीराजेंची शरद पवारांकडे मागणी
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
- ‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, रुग्णांच्या जिवाशी खेळू नका’, व्हेंटिलेटर प्रकरणावरून खंडपीठाने नेत्यांना सुनावले
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
