🕒 1 min read
मुंबई: पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. या भागात शेतीचे, घरांचे, रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता कुठेतरी पाऊस थांबला होता. मात्र आत पुन्हा हवमान विभागाने या भागात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.
पुढील पाच दिवसांसाठीचा म्हणजेच २९ जुलैपासून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ठाण्यात २९ जुलै तर मुंबईत 30 जुलैरोजी काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढचे चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.याबाबत मुंबई हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसळीकर यांनी समाज माध्यमावर माहिती दिली आहे.
IMD has issued district level Heavy rainfall at isolated places warnings for period 29 Jul to 2 Aug 2021 for Maharashtra. 5th day there is no warning.
for further details pl visit @RMC_Mumbai and @RMC_Nagpur websites of IMD pic.twitter.com/Byp8PUJqZB— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 29, 2021
रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा हा भाग आत कुठे पुराच्या नुकसानीतून ओसरत होता. मात्र आता पुन्हा एकदा या भागावर अस्मानी संकट कोसळण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हवामान विभागाने २ ऑगस्टपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह इतर काही जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दिपिका कुमारीने अचूक ‘लक्ष्य भेद’त केला उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश
- ‘आम्हाला भीक नको, काम करायचयं’, अभिनेत्री मेघा घाडगेने व्यक्त केली भावना
- ‘गुजरात आणि महाराष्ट्र एकाच देशातील दोन राज्य; मग महाराष्ट्राला मदत एक वर्षानंतर तीही तुटपुंजी का ?
- आता पाहणी नाही मदत सुरु- आदित्य ठाकरे
- कौतुकास्पद! मराठमोळ्या दिपाली सय्यदकडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत
‘
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
