मुंबई : जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी व सामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, आता अर्धा पावसाळा उलटल्यानंतरही मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसाची देखील प्रतीक्षा आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली असली तरी शेवटचे २ दिवस आणि सप्टेंबर महिन्याची सुरुवात चांगल्या पावसाने होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होतीच. परंतु आता महाराष्ट्राला आगामी २४ तासांत पाऊस चांगलेच झोडपून काढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आज दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
त्यामुळे पुढील चोवीस तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पाऊस कोसळणार आहे. आज मुंबईसह पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत पुढील चोवीस तासांत पावसाची धुव्वाधार बॅटींग होण्याची शक्यता आहे.
ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे. पालघर वगळता संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी अति तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुण्यासह अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग औरंगबादसह मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरास ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- ‘मंदिरे उघडलीच पाहिजे अन्यथा..’, राज ठाकरेंचा इशारा


