पुणे- बंगालच्या उपसागरावरून आलेला कमी दाबाचा पट्टा काल आंध्रप्रदेश ओलांडून कर्नाटक सीमेलगतच्या भागातून महाराष्ट्रात आला, परिणामी काल पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं. सोलापूर, सातारा, कोल्हापूर सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, अनेक भाग जलमय झाले, नद्यांना पूर आले. आधीच भरलेल्या धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू करावा लागला.
काही ठिकाणी किरकोळ पडझड झाली अक्कलकोट शहरातील जुन्या राजवाड्याला या अतिवृष्टीचा फटका बसला त्यामुळे राजवाड्याचा बुरुज ढासळला. पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या काठावरील कुंभार घाटालगत घाटाची भिंत कोसळली. अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्यानंही मोठं नुकसान झालं आहे. सांगली परिसरात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यात काल रात्री पर्यंत 2643.5 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.
जोरदार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये तर पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलं होतं.सिंहगड् रस्ता वाहतूक साठी बंद करण्यात आला होता. पुणे सोलापुर महामार्ग जड वाहनांना रात्रीनंतर सुरू करण्यात आला आहे. उजनि धरणातून सोडेलेल पाणी इंदापुर शहरात शिरल. निमगांव केतकी गावात पुरात अडकलेल्या 55 नागरिकांना वाचवण्यात यश आलं आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रातून नदी पत्रात ३४२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सात वाजता सोडण्यात आला आहे. तसेच परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग सोडला जाणार असल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान,हा कमी दाबाचा पट्टा अजूनही पश्चिम महाराष्ट्रातच असून तो उद्या कोकण ओलांडून अरबी समुद्रावर पोहोचेल. त्यानंतर त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या किनाऱ्या लगतच्या समुद्रावरून तो उत्तरेकडे कूच करण्याची शक्यता आहे . त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात येत्या दोन दिवस अनेक ठिकाणी मेघगर्जनेसहीत, विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होईल.
पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसह कोकणात काही ठिकाणी सोसाट्याच्या वार्याजसह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील घराबाहेर शक्यतो पडू नये. अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातही आज आणि उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र आता पावसाचा जोर ओसरू लागेल. उर्वरित राज्यात17 ऑक्टोबरनंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल.
महत्वाच्या बातम्या-
- खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सूनबाईंना विचारा- प्रीतम मुंडे
- विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठीही होणार ठाकरे-कोश्यारी संघर्ष ?
- मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताचा कट? राऊत यांच्या ट्वीटने खळबळ
- जमत नसेल तर राज्य शासनात परत जा; मुंबईत आयुक्तांविरोधात शिवसेना आक्रमक
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारने चुकीचा सल्ला देऊ नये : विनोद पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

