🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेशी बंड करत एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्ष थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. यावर आज सरन्यायाधीश रमण यांच्या खंडपीठसमोर सुनावणी सुरु असून शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे.
पक्षाचा सदस्य म्हणून चौकटीत राहून आपल्या नेत्याविरोधात आवाज उठवण्याचा मला हक्क आहे. आपल्या नेत्याविरोधात आवाज उठवल्याने अपात्र ठरवू शकत नाही असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील हरिश साळवे (Harish Salve) यांनी केला आहे. लक्ष्मणरेखा न ओलांडता पक्षांतर्गत आवाज उठवणे हे बंडखोरी म्हणू शकत नाही असंही त्यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसर्या सरकारने शपथ घेतली तर ते पक्षांतर नाही. २० आमदारांचा पाठिंबा न मिळालेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद बहाल करावं या कल्पनेत आपण आहोत का? अशी विचारणा हरिश साळवे यांनी केली आहे.
दरम्यान शिंदे गटाकडून हरिश साळवे यांनी जर एखाद्या पक्षात एखाद्या नेत्याने नेतृत्व करावं असं वाटत असेल तर त्यात चुकीचं काय? अशी विचारणा केली आहे. पक्षांतर तेव्हाच होते जेव्हा तुम्ही पक्ष सोडता आणि दुसऱ्याशी हातमिळवणी करता, पक्षात राहता तेव्हा नाही असे त्यांनी म्हटले आहे. तर दहाव्या सूचीनुसार फुटीर गटानं दुसऱ्या पक्षात विलीन होणं अनिवार्य असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडणारे अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. अंतरिम आदेश देत बंडखोरांना अपात्र ठरवावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Shinde Vs Thackeray : शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र
- Sanjay Raut : “रावसाहेब दानवे पाताळात फिरताय त्यांनी पृथ्वीवर…”, ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर
- Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंना आम्हीच शिवसेनेत आणलं असंही म्हणतील”, संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला
- Sanjay Raut : “दिल्लीसमोर झुकल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद…”, संजय राऊतांचा खोचक टोला
- Sanjay Raut : “संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा…”, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी संजय राऊतांचे ट्वीट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
