🕒 1 min read
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काल माध्यमांशी बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “2019 मध्ये मातोश्रीवर बंद दाराआड जी चर्चा झाली तेव्हा मी देखील तिथे उपस्थित होतो. ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असा फॉर्म्युला ठरलेला होता. मात्र उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी भाजपशी असलेली युती तोडली”. असा दावा दानवे यांनी केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
“असा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. आपण जर हॉटेल ब्लू सी वरळीच्या पत्रकार परिषदेतील अमित शाहा यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले निवेदन ऐकले असेल तर, रावसाहेब दानवे हे कुठेतरी पाताळात फिरताय त्यांनी पृथ्वीवर परत यावे, एवढेच मला सांगावे लागेल.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
“स्वतः अमित शाहा यांच्या संमतीने त्या पत्रकार परिषदेमध्ये आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितले होते, कि भविष्यातला शिवसेना भाजपमधील फॉर्म्युला हा ५०-५० टक्क्यांमध्ये सत्ता वाटपाचा आहे. दानवे साहेब माझ्या बाजूलाच राहतात ,त्यांना ती क्लिप हवी असेल तर मी पाठवतो. कदाचित त्यावेळी त्यांना पक्षाने विश्वासात घेतले नसेल.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल माध्यमांशी बोलताना “उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी अविचारी पक्षाशी युती केली, असंघाशी संघ केले”, असा आरोप केला. तसेच ज्यांच्याकडे सदस्य संख्या जास्त आहे, पक्ष त्यांचाच असतो, असे म्हणत अप्रत्यक्षपणे शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचेही म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “दिल्लीसमोर झुकल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद…”, संजय राऊतांचा खोचक टोला
- Sanjay Raut : “संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा…”, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी संजय राऊतांचे ट्वीट
- Uddhav Thackeray : “कितीही बाण घेऊन पळा, पण..”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा
- Rahul Shewale : उद्धव ठाकरेंना धक्का! खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी निवड
- Breaking news : मोठी बातमी : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
