Share

Sanjay Raut : “संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा…”, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी संजय राऊतांचे ट्वीट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षाचा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. शिवसेनेशी बंड करत सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटावर शिवसेनेने अपात्रतेची कारवाई केली होती. याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल्या आहेत. यावर ११ जुलैच्या सुनावणीत पुढील सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कोणतीही कारवाई होऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच सदरील प्रकरण सरन्यायाधीश रमण यांनी खंडपीठ स्थापन करून सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट केले होते. सदरील सुनावणी आज होणार असून त्यापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आले आहे.

“संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा देना हैं…!”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा हाथ पकडला आहे. कारण शिंदे गटात शामिल होत सेनेच्या आमदार आणि खासदारांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंचा हाथ सोडून एकनाथ शिंदेंचे बोट पकडले आहे. त्यातच सेनेला अजून एक मोठा धक्का बसला आहे.

खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेना लोकसभा गटनेतेपदी निवड-

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अजून एक मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन गटनेता बदलण्याची मागणी केली. १८ खासदारांपैकी १२ जणांचा गटनेता म्हणून खासदार राहुल  शेवाळे (Rahul Shewale) यांना पाठिंबा असल्याने गटनेतेपदी शेवाळे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली.  लोकसभाध्यक्ष ओम बिरला यांनी ही मागणी मान्य केल्याने उद्धव  ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!