🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील सत्ता संघर्षावर आज (२० जुलै) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिंदे गटाला शिवसेना (Shiv Sena) म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठींबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सदरील मागणी केली आहे. यापूर्वी लोकसभा अध्यक्षांनी गटनेतेपद आणि पक्ष प्रतोदपद याला रात्री उशिरा मान्यता दिली.आणि त्यानंतर आता शिंदे गटाची ही मागणी राजकारणाला नवे वळण देत आहे. एकनाथ शिंदे यांनी आमचीच शिवसेना खरी असल्याचे प्रत्येकवेळी म्हटले आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी निवड-
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अजून एक मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन गटनेता बदलण्याची मागणी केली. १८ खासदारांपैकी १२ जणांचा गटनेता म्हणून खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांना पाठिंबा असल्याने गटनेतेपदी शेवाळे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. लोकसभाध्यक्ष ओम बिरला यांनी ही मागणी मान्य केल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “रावसाहेब दानवे पाताळात फिरताय त्यांनी पृथ्वीवर…”, ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर
- Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंना आम्हीच शिवसेनेत आणलं असंही म्हणतील”, संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला
- Sanjay Raut : “दिल्लीसमोर झुकल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद…”, संजय राऊतांचा खोचक टोला
- Sanjay Raut : “संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा…”, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी संजय राऊतांचे ट्वीट
- Uddhav Thackeray : “कितीही बाण घेऊन पळा, पण..”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
