नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत खरी शिवसेना कुणाची? शिवसेना कि शिंदे गट यावरही निर्णय होणार आहे. शिवसेनेने ज्यांची सेनेतून हकालपट्टी केली त्यांना शिंदेंनी अनेक पदांवर स्थान दिले आहे. त्यातच काल शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेना लोकसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटाला चांगलाच टोला लगावला.
“शिवसेनेतून फुटलेले, तुटलेले बाळासाहेब ठाकरेंना आम्हीच शिवसेनेत आणलं असंही म्हणतील. हे मानसिक स्थिती बिघडल्याचे लक्षण आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांवर लक्ष देण्याची गरज नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे कि, देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना इडीने अटक केली असून यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी नेहमी केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईवर प्रतिक्रिया देत असतो. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्याने मी यावर बोलू शकत नाही.” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा…”, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी संजय राऊतांचे ट्वीट-
“संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा देना हैं…!”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा हाथ पकडला आहे. कारण शिंदे गटात शामिल होत सेनेच्या आमदार आणि खासदारांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंचा हाथ सोडून एकनाथ शिंदेंचे बोट पकडले आहे.
संसार में सबसे आसान काम
अपनेको धोखा देना हैं…!
प्रेमचंद. pic.twitter.com/5ysO2XE86t— Sanjay Raut (@rautsanjay61) July 20, 2022
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “दिल्लीसमोर झुकल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद…”, संजय राऊतांचा खोचक टोला
- Sanjay Raut : “संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा…”, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी संजय राऊतांचे ट्वीट
- Uddhav Thackeray : “कितीही बाण घेऊन पळा, पण..”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा
- Rahul Shewale : उद्धव ठाकरेंना धक्का! खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी निवड
- Breaking news : मोठी बातमी : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

