Share

Health Care | सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय आहे जायफळ, कसा करायचा वापर? जाणून घ्या

Published On: 

🕒 1 min read

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा सुरू होतात मोसमी आजारांचा (Viral Infaction) धोका वाढायला लागतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आरोग्याची (Health) अधिक काळजी (Care) घ्यावी लागते. हिवाळ्यात बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप खोकल्याचा त्रास खूप वाढतो. अनेकदा या समस्या औषधे घेऊ सुद्धा दूर होत नाही. अशा परिस्थितीत हे आजार दूर करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक पद्धतींचा वापर करू शकतात. सर्दी खोकल्यापासून कमी होण्यासाठी तुम्ही स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेले जायफळ वापरू शकतात. जायफळ जेवणाची चव वाढवायचे काम करतो. त्याचबरोबर जायफळ एक औषध म्हणून देखील वापरले जाते. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात अँटि-बॅक्टरियल आणि अँटि-बायोटिक गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म मोसमी रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. जायफळाचा पुढील पद्धतीने वापर करून तुम्ही सर्दी खोकल्याच्या समस्या दूर करू शकतात.

सर्दीसाठी रामबाण उपाय

जायफळामध्ये मुबलक प्रमाणात अँटि-बॅक्टरियल गुणधर्म आढळतात. ते गुणधर्म सर्दीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यास मदत करू शकतात. यासाठी तुम्ही जायफळाची बारीक करून पावडर ती खाऊ शकतात. जायफळाचा प्रभाव उष्ण असतो त्यामुळे दिवसातून दोन ते तीन ग्रामपेक्षा जास्त जायफळाचे सेवन करू नये.

खोकल्यासाठी फायदेशीर

जायफळामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. हे घटक खोकल्यापासून संरक्षण करू शकतात. कफची समस्या असल्यास तुम्ही एक चमचा जायफळ पावडर कोमट तुपामध्ये टाकून खाऊ शकतात. त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जायफळ आणि तुपाचे मिश्रण छातीवर लावून झोपू शकतात. जायफळ आणि तुपाचा वापर आठवड्यातून दोन-तीन वेळा केल्यास तुमची खोकल्याची आणि कफची समस्या दूर होऊ शकते.

जायफळाच्या नियमित सेवनाने तुम्ही सर्दी-खोकला यासारख्या आजारापासून दूर राहू शकतात. कारण यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, मॅग्नेशियम, कॉपर, फॉस्फरस इत्यादी पोषक घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे जायफळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!