Share

Shivsena । “मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराणा दुकानावरचा गल्ला? शेठ नसले तरी दाखले शेठ दुकान चालवतात”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांच्या गैरहजेरीत एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत विराजमान झाल्याचे दिसत आहेत. यावरुन आता विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून एक फोटो ट्वीट करण्यात आला असून त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी देखील यावरून शिंदेंवर निशाणा साधलाय.

मनीषा कायंदे काय म्हणाल्या?

सध्या शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वाद टोकाला पोहचले आहेत. शिवसेना नेते आणि शिंदे गटातील नेते हे सातत्याने एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतायत. शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी राष्ट्रवादीने व्हायरल केलेला फोटो स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट करत श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पोस्टमध्ये कायंदे म्हणाल्या कि, मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराणा दुकानावरचा गल्ला? शेठ नसले तरी दाखले शेठ दुकान चालवतात, असं त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादीने नेमके काय आरोप केले?

रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, ‘खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूये. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?’ अशी टीका वरपे यांनी केली आहे.

पुढे वरपे म्हणाले कि, कदाचित राज्याचे मुख्यमंत्री गणपती मंडळ, नवरात्र उत्सव, पितृपक्ष किंवा दिल्ली वाऱ्यांमध्ये व्यग्र असल्यामुळे राज्यातील इतर लोकांचं काम पाहण्याची जबाबदारी सुपर सीएम म्हणून श्रीकांत शिंदेंकडे दिली आहे, असं आम्हाला वाटतं. राज्याचा कारभार नेमका कोण पाहतंय? हे राज्य अधांतरी आहे असंच वाटतंय. ज्याला जे वाटतंय, तो ते करतोय, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!