मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गट प्रमुखांच्या मेळाव्यात शिंदे गटावर जोरदार टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर मंत्री संदिपान भुमरे चांगलेच चर्चेत आले. त्यांनी केलेल्या इशारांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. काँग्रसने हा व्हिडीओ शेअर करत खोचक टोला लगावला आहे.
“कधी फडणवीस सर्वांसमोर चिठ्ठी देऊन शिंदेंना काय बोलायचं ते सांगतात. कधी महाजन तोंडासमोर कागद धरुन काय उत्तर द्यायचं ते पुटपुटतात आणि आता तर शिंदे गटातील आमदार भुमरे देखील शिंदे भाषण करत असताना इशारे करुन लक्ष वेधतात. मुख्यमंत्र्याची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडली जात नाही आहे,” असे काँग्रेसने म्हटले आहे.
ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल –
शिवसेनत बंड झाला त्या दरम्यान देखील संदिपान भुमरे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शपथ घेतल्यानंतर “मतदार संघात पोस्टर सोडा, मिर्ची लागेल असे पोस्टर सोडा”, असे भुमरे कार्यकर्त्यांना म्हणाले होते.
कधी फडणवीस सर्वांसमोर चिठ्ठी देऊन शिंदेंना काय बोलायचं ते सांगतात, कधी महाजन तोंडासमोर कागद धरुन काय उत्तर द्यायचं ते पुटपुटतात आणि आता तर शिंदे गटातील आमदार भुमरे देखील शिंदे भाषण करत असताना इशारे करुन लक्ष वेधतात.
मुख्यमंत्र्याची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडली जात नाही आहे! pic.twitter.com/5H1W8g8VFS
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 23, 2022
तसेच यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांना चिमटे काढले होते. धनंजय मुंडेना देवेंद्र फडणवीस यांनी प्रेम, दया, करुणा दाखवली, दाखवली ना? त्यामुळे परत दाखवता येणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यानंतर विधिमंडळात खळखळाट झाला. शिंदेंच्या मागे बसलेले मंत्री संदिपान भुमरे हे अब्दुल सत्तार यांना गुद्दा घालत हसू लागले.
महत्वाच्या बातम्या :
- Fact Check | पुण्यात खरचं मुलं पळवणारी टोळी आहे का?
- Devendra Fadnavis | गोपीनाथ मुंडेंनी पाहिलेले स्वप्न सरकारने पूर्ण केले – देवेंद्र फडणवीस
- Shrikant Shinde | मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याच्या आरोपांवर श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण
- Chandrashekhar Bawankule | “उरलेले दोन चारजण वाचवा, नाही तर…”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- New Smartphone Launch | Tecno Pova Neo 5G ची लॉन्चिंग तारीख जाहीर, जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

